17 May 2024 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार?
x

Advik Capital Share Price | एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा आणि संयम राखा, लॉटरी ठरू शकतो शेअर

Advik Capital Share Price

Advik Capital Share Price | अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वाढीसह 2.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात घसरले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.16 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.90 रुपये होती.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी अॅडविक कॅपिटल स्टॉक 2.43 टक्के घसरणीसह 2.41 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अॅडविक कॅपिटल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 115 कोटी रुपये आहे. 29 ऑक्टोबर 2020 रोजी अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 28 पैशांवर ट्रेड करत होते. तर या नीचांक किंमत पातळीवरुन हा स्टॉक 12 पट वाढला आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार कंपनीने निधी उभारणीची योजना आखली आहे.

सेबीला दिलेल्या माहितीनुसार अॅडविक कॅपिटल कंपनीने पर्यायी गुंतवणूक निधी श्रेणी-II च्या परवान्यासाठी SEBI कडे विनंती अर्ज दाखल केला आहे. अॅडविक कॅपिटल कंपनी अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडातून 250 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.

मागील 2 वर्षांत अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरची किंमत 29 पैशांवरून वाढून 5 रुपये किमतीवर पोहचली होती. मागील 2 वर्षात अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1350 टक्के परतावा कमावून दिला होता.

अॅडविक कॅपिटल ही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना आवश्यक भाडेपट्टी, वित्त, गुंतवणूक आणि इतर कॉर्पोरेट भाडेपट्टीवर सल्ला देण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचे ग्राहक केवळ भारतातच नाही तर जगभरात पसरले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Advik Capital Share Price BSE 12 December 2023.

हॅशटॅग्स

#Advik Capital Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x