14 May 2024 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Vikas Ecotech Share Price | 3 रुपयाचा शेअर धुमाकूळ घालतोय, आजही 7.14% वाढला, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.37 टक्क्यांच्या वाढीसह 3.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स प्रचंड तेजीत वाढत होते. विकास इकोटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 488 कोटी रुपये आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.35 रुपये होती. नुकताच, विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीला स्मार्ट संयुग्मित पॉलिमर नॅनो कंपोझिटचे पेटंट मिळाले आहे. आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी विकास इकोटेक स्टॉक 7.14 टक्के वाढीसह 3.75 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीने गंजापासून संरक्षण मिळवण्यासाठी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यासाठी कंपनीने पेटंट अर्ज दाखल केला होता. हा अर्ज आता मंजूर झाला आहे. विकास इकोटेक कंपनीने 12 डिसेंबर 2023 रोजी भारतीय पेटंट कायदा 1970 च्या कलम 43 अंतर्गत गंज संरक्षणासाठी स्मार्ट संयुग्मित पॉलिमर नॅनो कंपोझिटचे पेटंट मिळवले आहे.

विकास इकोटेक कंपनीवर खूप मोठे कर्जाचे डोंगर होते. जे आता 42.5 कोटी रुपयेवर आले आहे. या कंपनीने आतापर्यंत आपले 74 टक्के कर्ज परतफेड केले आहे. मागील 3 वर्षांत, विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के नफा मिळवून दिला आहे. विकास इकोटेक कंपनी मुख्यतः ग्राहक कृषी, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, इलेक्ट्रिकल, फुटवेअर, फार्मा, ऑटोमोटिव्ह, वैद्यकीय उपकरण आणि घटक या संबंधित क्षेत्रात व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price BSE 19 December 2023.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x