17 May 2024 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

IRFC Share Price | स्वस्त IRFC शेअर्समध्ये ब्रेकआऊट! मागील 10 दिवसात 40 टक्के परतावा दिला, पुढे बुलेट ट्रेन गतीने वाढणार?

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअर्सने मागील 12 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 75 रुपये किमतीवरून वाढून 104 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 10 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.

आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी IRFC स्टॉक 4.60 टक्के वाढीसह 96.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अनेक महिन्यांच्या एकत्रीकरणानंतर IRFC स्टॉकमध्ये वरच्या दिशेने ब्रेकआउट पाहायला मिळाला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 13 टक्के अधिक वाढू शकतो.

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ही तीन दशक जुनी कंपनी भारतीय आणि परकीय भांडवली बाजारातून निधी उभारणारी भारतीय रेल्वेची वित्तपुरवठा करणारी शाखा म्हणून व्यवसाय करते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने 101.50 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 104.30 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले होते.

एसबीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, IRFC आणखी काउंटरमध्ये 13 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. तज्ञांच्या मते, अल्पावधीत IRFC कंपनीचे शेअर्स 108-113 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी गुंतवणूकदारांना IRFC स्टॉक खरेदी करताना 96 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला IRFC स्टॉकमध्ये 56 दिवसांचे एकत्रीकरण ब्रेकआउट पाहायला मिळाले होते. आणि तेव्हापासून अवघ्या 10 ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC स्टॉक 40 टक्के वाढला आहे.

IRFC कंपनीचे शेअर्स एवरेज डायरेक्शनल इंडेक्स यासारख्या टेक्निकल निर्देशकांवर जबरदस्त तेजीचे संकेत देत आहेत. IRFC स्टॉकच्या दैनिक चार्टवर 33.31 रुपये आणि साप्ताहिक चार्टवर 50.98 रुपये किमतीवर मजबूत कल पाहायला मिळत आहे. या स्टॉकमधील सर्व मूव्हिंग अॅव्हरेज आणि मोमेंटम इंडिकेटर-आधारित सेट-अप तेजीचे संकेत देत आहे. याव्यतिरिक्त, OBV आणि मनी फ्लो इंडेक्स सारखे व्हॉल्यूम-आधारित इंडेक्स देखील IRFC स्टॉकमध्ये मजबूत वाढ दर्शवत आहेत.

IRFC स्टॉकच्या दैनंदिन चार्टवर उच्च उच्च आणि उच्च निम्न फॉर्मेशनसह मजबूत अपट्रेंड पाहायला मिळत आहे. गुंतवणूक सल्लागारांनी लोकांना IRFC स्टॉक 110/125 रुपये या टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. IRFC स्टॉक आपल्या 50-दिवस आणि 200-दिवसांच्या सिंपल मूव्हिंग अॅव्हरेजवर ट्रेड करत आहे. या स्टॉकचा 1-वर्षाचा बीटा 0.7 आहे.

IRFC कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीच्या महसुल संकलनात एकूण 16 टक्के वाढ साध्य केली होती. आणि या तिमाहीत कंपनीने एकूण 6,766.32 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत IRFC कंपनीने 5,809.80 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर 2023 तिमाहीत IRFC कंपनीने 1549.87 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. तर मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 1,714.28 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

SBI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, IRFC ही सरकारी कंपनी भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधा विकास योजनांना पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असून पुढील काही वर्षांत नवीन ट्रेन्सच्या अधिग्रहणासाठी IRFC कंपनीने 1 ट्रिलियन रुपगे गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE 21 December 2023.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x