18 May 2024 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समधील तेजी पाहून तज्ज्ञ उत्साही, नवीन मजबूत टार्गेट प्राइस जाहीर

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्राडे ट्रेडमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 724.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये चांगली खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच टाटा मोटर्स कंपनीला उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 1350 डिझेल बसेसच्या ‘चैसिस’ पुरवण्यासाठी मोठी ऑर्डर दिली आहे.

टाटा मोटर्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या टाटा एलपीओ 1618 डिझेल बस चेसिस कंपनीला मोठे कंत्राट मिळाले आहे. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के वाढीसह 743.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा मोटर्स कंपनीला नवीन मिळालेले कंत्राट सरकारी निविदा प्रक्रियेद्वारे आयोजित केलेल्या ई-बिडिंग अंतर्गत देण्यात आले आहे. टाटा मोटर्स कंपनी या ऑर्डर अंतर्गत बसच्या ‘चेसिस’ टप्प्याटप्प्याने पुरवणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स कंपनीने आतापर्यंत विविध राज्यांना आणि सार्वजनिक वाहतूक उपक्रमांना 58,000 पेक्षा जास्त बस पुरवल्या आहेत.

अनेक ब्रोकरेज फर्म सध्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. शेअरखान फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर 840 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या JLR, PV आणि CV व्यवसायात मजबूत सुधारणा पाहायला मिळत आहे आणि कंपनीच्या निव्वळ ऑटोमोटिव्ह कर्जात देखील घट होत आहे.

टाटा मोटर्स कंपनीला नुकताच हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या बस बनवण्यासाठी CMVR प्रकारचे मान्यता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. टाटा मोटर्स कंपनीने ईव्ही क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ही कंपनी हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या मार्गावर आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 28 December 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x