13 May 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस! स्टॉक प्राईस सुद्धा स्वस्त, खरेदीला ऑनलाईन गर्दी Kuber Yog 2024 | कुबेर योग 'या' 4 राशींच्या लोकांसांठी भाग्यशाली, यामध्ये तुमची नशीबवान राशी आहे का? Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी
x

Gensol Engineering Share Price | असे शेअर्स निवडा! मागील फक्त 2 वर्षात दिला 3900% परतावा, बोनस शेअर्सही मिळतात

Gensol Engineering Share Price

Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 803.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता.

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनी भांडवल उभारणीचा विचार करत आहे. आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 846.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप केले होते. जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत निधी उभारणीच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल. जेनसोल इंजिनिअरिंग कंपनी प्रायव्हेट प्लेसमेंट, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, प्रेफरेंशियल इश्यू किंवा इतर मार्गाने भांडवल उभारणीचे पर्याय शोधू शकते.

मागील 2 वर्षात या कंपनीने दोन वेळा आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहे. जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीने ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या शेअरधारकांना 1 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर ऑक्टोबर 2023 मध्ये या कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

मागील 2 वर्षात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3900 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 डिसेंबर 2023 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 803.05 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. 2023 यावर्षात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 137 टक्के वाढली आहे. 2 जानेवारी 2023 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 337.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आज या कंपनीचे शेअर्स 846.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 6 महिन्यांत जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 79 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 945.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 265.68 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gensol Engineering Share Price NSE Live 29 December 2023.

हॅशटॅग्स

#Gensol Engineering Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x