17 May 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार?
x

Alok Industries Share Price | 32 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल! अंबानींची गुंतवणूक, 5 दिवसात 50% परतावा, यापूर्वी 1000% परतावा दिला

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आता आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.

मागील 5 दिवसात आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के पेक्षा अधिक वाढली आहे. मुकेश अंबानीं यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने नुकताच आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये 3300 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 19.89 टक्के वाढीसह 32.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये ही गुंतवणूक नॉन-कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्सच्या माध्यमातून केली आहे. आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 32 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 4 वर्षांत आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

10 जानेवारी 2020 रोजी आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 32.56 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 5 दिवसात आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 21.61 रुपये किमतीवरून वाढून 32.56 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 10.07 रुपये होती. तर वार्षिक उच्चांक किंमत पातळी 32.56 रुपये होती. रिलायन्स कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये 3300 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे प्रत्येकी 1 रुपये किमतीवर 33000000000 नॉन-कन्व्हर्टेबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स अधिग्रहण केले आहे. या व्यवहाराचे एकूण मूल्य 3300 कोटी रुपये आहे

अलोक इंडस्ट्रीज कंपनीने माहिती दिली आहे की, या नॉन-कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्सवर कंपनी 9 टक्के वार्षिक लाभांश देणार आहे. 2020 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएम फायनान्शियल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जाणाऱ्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीला खरेदी केले होते.

30 सप्टेंबर 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 40 टक्के भाग भांडवल रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने धारण केले आहे. आणि JM Financial ARC कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price NSE Live 06 January 2024.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x