12 May 2024 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Olectra Share Price | मागील 3 वर्षांत दिला 1150 टक्के परतावा, ऑर्डरबुक मजबूत असणारा शेअर वेळीच खरेदी करा

Olectra Share Price

Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली. बुधवारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 15 टक्क्यांच्या वाढीसह 1748 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 11.05 टक्के वाढीसह 1537.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने अवघ्या एका वर्षात 374.35 रुपये या नीचांक किमतीवरून 300 टक्क्यानी मजबूत झाले आहे. मागील वर्षी 23 फेब्रुवारी 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 375 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 2.83 टक्के वाढीसह 1,757.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील तीन वर्षांत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1150 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 3 वर्षांपूर्वी 27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीवरून ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉकने लोकांना 6000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला अनेक ऑर्डर मिळाल्या आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला हायड्रोजन बसेसची, इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे. तसेच ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीसोबत भागीदारी देखील केली आहे.

हैदराबादस्थित ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने जुलै 2024 पर्यंत नवीन उत्पादन केंद्र सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सुरुवातीला या केंद्रातून 5,000 बसचे उत्पादन केले जाईल. आणि हळूहळू हे उत्पादन 10,000 बसेसपर्यंत वाढवले जाईल. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने किमान 2,500 बस पुरवठा करण्याची योजना आखली आहे. ऑलेक्ट्रा कंपनीकडे सध्या 19,000 पेक्षा जास्त बसची ऑर्डर प्रलंबित आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने 232 बसेस वितरित केल्या आहेत. तर दुसऱ्या सहामाहीत कंपनी 500 पेक्षा जास्त बसेस पुरवठा करायच्या आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने भारत सरकारच्या पीएम ई-बस सेवा कार्यक्रमावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या कार्यक्रमांतर्गत भारत सरकार देशात 10000 इलेक्ट्रिक बस चालवणार आहे.

भारत सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये पीपीपी मॉडेलवर 10,000 इलेक्ट्रिक बस कार्यान्वित करण्याची योजना आखली होती. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक ही कंपनी Megha Engineering & infrastructure Limited कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक ही कंपनी भारतात इलेक्ट्रिक बसेस बनवण्याचा व्यवसाय करते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन नेटवर्कसाठी सिलिकॉन/संमिश्र इन्सुलेटरची निर्मिती करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Share Price NSE Live 11 January 2024.

हॅशटॅग्स

Olectra Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x