19 May 2024 4:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Addictive Learning Technology IPO | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मजबूत परतावा मिळेल, GMP पहा

Addictive Learning Technology IPO

Addictive Learning Technology IPO | 2024 या नवीन वर्षात भारतीय शेअर बाजारातील निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकानी आपली उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. अनेक नवीन कंपनीन्या आपले IPO लाँच करून शेअर बाजारात रजिस्टर होत आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना देखील फायदा होत आहे. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO लाँच होणार आहे.

गुंतवणुकदार 19-23 जानेवारी 2024 दरम्यान अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची अप्पर किंमत बँड प्रति शेअर 140 रुपये निश्चित केली आहे. अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1,000 शेअर्स ठेवले आहेत. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रवर्तक रामानुज मुखर्जी आहेत. आणि कंपनीचे ब्रँड नाव ‘लॉसिखो’ आहे.

अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO अजून लाँच झालेला नाही. मात्र ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअर्सने धुमाकूळ घातला आहे. अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 100 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ग्रे मार्केटमधील प्रीमियम किंमत आणि IPO शेअर किंमत बँड लक्षात घेता या कंपनीचे शेअर्स 240 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. याचा अर्थ गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी मजबूत फायदा होईल.

अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO मध्ये 50 टक्के वाटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवला आहे. 15 टक्के वाटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. तर 35 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे.

अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजीज कंपनीचा IPO मध्ये ज्या लोकांना शेअर्स मिळणार नाही, त्यांना 25 जानेवारीपासून पैसे परत केले जातील. आणि त्याच दिवशी गुंतवणुकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी NSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध केले जातील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Addictive Learning Technology IPO GMP 12 January 2024.

हॅशटॅग्स

Addictive Learning Technology IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x