14 May 2024 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार
x

Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सची जोरदार खरेदी, गुंतवणुकदार अक्षरशः तुटून पडले, नेमकं कारण काय?

Infosys Share Price

Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस या आयटी कंपनीचे शेअर्स 7.84 टक्क्यांच्या वाढीसह 1,612.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ट्रेडिंग सेशन दरम्यान या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 1,615.80 रुपये किमतीवर पोहचले होते.

आज भारतीय शेअर बाजारात अफाट तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्सने आज 73000 चा टप्पा पार केला आहे. तर निफ्टी इंडेक्स देखील 22000 च्या पार गेला आहे. तज्ञांच्या मते इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उसळी पाहायला मिळू शकते. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 2.33 टक्के वाढीसह 1,650.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

येस सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल आणि एमके ग्लोबल फायनान्शियल फर्मच्या तज्ञांनी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. YES सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी इन्फोसिस स्टॉकची टारगेट प्राइस 1870 रुपये निश्चित केली आहे. तर मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 1750 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. एमके ग्लोबल फायनान्शियल फर्मच्या तज्ञांच्या मते इन्फोसिस स्टॉक 1850 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिस कंपनीने निव्वळ मद्यात 7.3 टक्क्यांची घट नोंदवली आहे. या तिमाहीत इन्फोसिस कंपनीचा नफा घसरून 6,106 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 6,586 कोटी रुपये नफा कमावला होता. इन्फोसिस कंपनीचे परिचालन उत्पन्न या तिमाहीत 1.3 टक्क्यांच्या वाढीसह 38,821 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीचे परीचलन उत्पन्न 38,318 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

डिसेंबर 2023 तिमाहीत इन्फोसिस कंपनीला 3.2 अब्ज डॉलर्स मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या होत्या. मागील नऊ तिमाहीत इन्फोसिस कंपनीच्या ऑर्डर बुकने ही पातळी स्पर्श केली आहे. इन्फोसिस कंपनीच्या संचालक मंडळाने बेंगळुरूस्थित सेमीकंडक्टर डिझाइन सर्व्हिस प्रोव्हायडर इन्सेमी कंपनीचे 280 कोटी रुपये किमतीवर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या वार्षिक आधारावर 7 टक्क्यांच्या घसरणीसह 3,22,663 वर आली आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत कर्मचऱ्यांचे प्रमाण 1.8 टक्के कमी झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 15 January 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x