18 May 2024 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीची ओर्डेरबुक अजून मजबूत झाली, स्टॉकमध्ये तुफान वाढीचे संकेत

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | गौतम अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. ग्रीन हायड्रोजन ट्रान्सिशनल स्कीम अंतर्गत अदानी एंटरप्रायझेस कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 3089.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 0.99 टक्के घसरणीसह 3,059 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

अदानी एंटरप्रायझेस या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.52 लाख कोटी रुपये आहे. एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करणाऱ्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स हिंडनबर्ग अहवालातील आरोपामुळे कोसळले होते. त्यांतून या कंपनीचे शेअर्स बरेच सावरले आहेत.

मागील एका वर्षभरात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये 14.84 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीला जे नवीन काम मिळाले आहे, ते काम कंपनीला 30 महिन्यांत पूर्ण करायचे आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीला हायड्रोजन संक्रमण योजनेद्वारे 198.50 मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारायचा आहे.

जून 2023 तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीने 674 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी जून तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीने 469 कोटी रुपये नफा कमावला होता. म्हणजेच मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 44 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीने 25438 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जो मागील वर्षीच्या तुलनेत 38 टक्के कमी होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 16 January 2024.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x