17 May 2024 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
x

Aarti Industries Share Price | मल्टिबॅगर आरती इंडस्ट्रीज शेअर 1 दिवसात 10.63% वाढला, पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर

Aarti Industries Share Price

Aarti Industries Share Price | आरती इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे आज अप्पर सर्किटमध्ये अडकले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक 11 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. आरती इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 24,110 कोटी रुपये आहे. या कंपनीची स्थापना 1984 साली झाली होती. आरती इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मुख्यतः बेंझिन-आधारित डेरिव्हेटिव्ह आणि विशेष रसायने बनवण्याचा व्यवसाय करते.

आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रमुख उत्पादनात नायट्रो क्लोरो बेंझिन, डाय-क्लोरो बेंझिन, फेनिलेनेडायमिन्स, नायट्रो टोल्युइन व्हॅल्यू चेन आणि त्याच्या समतुल्य सल्फ्यूरिक ऍसिड आणि डाउनस्ट्रीम यांचा समावेश होतो. आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आरती इंडस्ट्रीज स्टॉक 10.63 टक्के वाढीसह 676.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरती इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची ओपनिंग 10 टक्क्यांच्या वाढीसह झाली होती. काही वेळात हा स्टॉक 679.50 रुपये किमतीवर पोहचला होता. आरती इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स अवघ्या दोन दिवसांत 13 टक्क्यांनी मजबूत झाले होते.

18 जानेवारी 2024 रोजी आरती इंडस्ट्रीज कंपनीने विशिष्ट विशेष रसायनाच्या पुरवठ्यासाठी बहुराष्ट्रीय व्यापारी समूहासोबत दीर्घकालीन करार संपन्न केला आहे. या कराराच्या माध्यमातून आरती इंडस्ट्रीज कंपनीला 6,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त महसूल उत्पन्न मिळेल.

या नवीन करारानुसार आरती इंडस्ट्रीज कंपनीला आपल्या ग्राहकांना चार वर्ष कालावधीसाठी विशेष रसायने पुरवठा करायची आहेत. 27 डिसेंबर 2023 रोजी आरती इंडस्ट्रीज कंपनीने नऊ वर्ष कालावधीसाठी ग्लोबल अॅग्रोकेम कंपनीसोबत दीर्घकालीन करार केला आहे. यातून कंपनीला 3,000 कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. MK ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांनी आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकला ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांनी या स्टॉकची टारगेट प्राइस म्हणून 750 रुपये किंमत निश्चित केली आहे.

आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लेच्या तज्ञांनी सुध्दा आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांनी आरती इंडस्ट्रीज स्टॉकवर 575 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली होती. ही टार्गेट किंमत शेअरने आधीच पार केली आहे. आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या महसुलात देखील 3 टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे.

जून 2023 तिमाहीत आरती इंडस्ट्रीज कंपनीने 1,414 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीने 1,454 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 30 टक्क्यांच्या वाढीसह 91 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aarti Industries Share Price NSE Live 20 January 2024.

हॅशटॅग्स

#Aarti Industries share price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x