14 May 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | लॉटरी लागणार! हा IPO शेअर पहिल्याच दिवशी 100 टक्केपेक्षा जास्त परतावा देणार, GMP संकेत Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक येणार तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस प्राईस Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकला या प्राईसवर पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा अलर्ट EPFO Online Claim | पगारदारांसाठी अलर्ट! तुमचा नंबर सुद्धा त्यात नाही ना? पुढे क्लेम सेटलमेंट कशी असेल? Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय
x

Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 41 रुपयाचा सुझलॉन शेअर तेजीत येणार, ब्रेकआऊटनंतर ही असेल पुढची टार्गेट प्राइस

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षात 318 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित घसरणीसह 41.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 41.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 6.60 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 45.70 रुपये किमतीवर पोहचले होते. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 44 रुपयेच्या पार गेले तर पुढील टप्पा हा 50 ते 54 रुपये असेल. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 52 ते 55 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 28.62 टक्के मजबूत झाले आहेत. तर 1 जानेवारी 2014 पासून आतापर्यंत 9.42 टक्के मजबूत झाले आहेत.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 318.00 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 538.17 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका आठवड्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये सरासरी 6 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. तर मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीचे दररोज सरासरी 7 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सचे एकूण दर्शनी मूल्य 2 रुपये आहे. आणि सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 56,829 कोटी रुपये आहे.जी

सुझलॉन एनर्जी कंपनी नुकताच कर्जमुक्त झाली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे. पूर्वी सुझलॉन एनर्जी कंपनी पूर्णतः कर्जात बुडाली होती. मात्र कर्ज फेडण्यासाठी कंपनीने आणखी कर्ज घेतले. आता परिस्थिती अशी आहे की, कंपनी तोट्यातून नफ्यात आली आहे. यामुळेच किरकोळ गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड आणि परकीय गुंतवणूकदारांनी देखील या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 23 January 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x