19 May 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! केवळ 45 रुपयांचा शेअर खरेदीकरून पैसा अल्पावधीत वाढवा

Bonus Shares

Bonus Shares | रामा स्टील ट्यूब्स या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. नुकताच रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सकारात्मक बातमी जाहीर करून देखील या कंपनीचे शेअर्स आज मजबूत विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत.

लोह आणि लोह उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणारी रामा स्टील ट्यूब्स कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 2.17 टक्के घसरणीसह 45.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीने अद्याप बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. मागील सात वर्षात ही तिसरी वेळ असेल जेव्हा रामा स्टील ट्यूब्स कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी रामा स्टील ट्यूब्स कंपनीने जानेवारी 2023 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. कंपनीने एका शेअरवर 4 बोनस शेअर्स वाटप केले होते.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीने मार्च 2016 मध्ये देखील गुंतवणुकदारांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. यासह कंपनीने मार्च 2016 मध्येच आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 2 शेअर्समध्ये विभाजित केले होते.

मागील 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 4385 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. 13 मे 2020 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 1.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 24 जानेवारी 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 46.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 3 वर्षात रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1371 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 जानेवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 26.10 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares for investment on 25 January 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x