19 May 2024 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Titan Share Price | झुनझुनवाला फॅमिलीचा खास मल्टिबॅगर शेअर, टायटन शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Titan Share Price

Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.3 टक्क्यांच्या वाढीसह 3712.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअर किंचित घसरणीसह क्लोज झाला. टायटन कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

आर्थिक वर्ष 2024 च्या डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 1040 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात टायटन कंपनीने 951 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 3,615 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

डिसेंबर 2023 तिमाहीत टायटन कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 20 टक्के वाढीसह 13052 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत टायटन कंपनीने 10,875 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत टायटन कंपनीचा EBITDA 9.5 टक्के वाढीसह 1457 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी या कंपनीचा EBITDA 1330 कोटी रुपये होता. या तिमाहीत टायटन कंपनीचा EBITDA मार्जिन 100 बेसिस पॉइंट्सच्या घसरणीसह 11.2 टक्केवर आला आहे. डिसेंबर तिमाहीत टायटन कंपनीच्या ज्वेलरी विभागाचे एकूण उत्पन्न 23 टक्के वाढून 11,709 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

डिसेंबर तिमाहीत टायटन कंपनीची उपकंपनी असलेल्या तनिष्क शाखेने भारतात नवीन 18 आउटलेट लाँच केले आहे. तर मिया स्टोअर्सने 16 नवीन शोरुम लाँच केले आहेत. टायटन कंपनीकडे आता 453 तनिष्क स्टोअर्स, 161 मिया स्टोअर्स आणि आठ जोया स्टोअर्स आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत टायटन कंपनीला ॲनालॉग घड्याळांच्या विक्रीमधून 810 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. वेअरेबल पोर्टफोलिओमधून कंपनीला 136 कोटी रुपये महसूल मिळाला आहे.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि स्टॉक वर 4,106 रुपये ही नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने टायटन शेअर्सची नवीन टार्गेट प्राईस 4,100 रुपये निश्चित केली आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 4,200 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Share Price NSE Live 03 February 2024.

हॅशटॅग्स

#Titan Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x