15 May 2024 6:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Vikas Lifecare Share Price | पेनी शेअर प्राईस 7 रुपये! तुफान तेजीत पैसा मिळतोय, आजही 4.23 टक्के परतावा दिला

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.41 टक्क्यांच्या वाढीसह 7.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1020 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 133 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.23 टक्के वाढीसह 7.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 ऑगस्ट 2023 रोजी 3.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक तब्बल 133 टक्क्यांनी वाढून 7.10 रुपये किमतीवर पोहचला होता. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, विकास लाईफ केअर लिमिटेड आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड यांनी एकत्रितपणे IGL जेनेसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड या संयुक्त उपक्रमाची सुरुवात केली आहे.

ही कंपनी देशात स्मार्ट गॅस मीटर बनवण्याचे काम करणार आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने स्मार्ट गॅस मीटर बनवण्यासाठी होली गृप या जगातील सर्वात मोठ्या स्मार्ट मीटर बनवणाऱ्या कंपनीचा भाग असलेल्या हँगझोउ बीटा मीटर कंपनीसोबत तांत्रिक सहकार्य करार संपन्न केला आहे.

IGTL कंपनीने स्मार्ट गॅस मीटर बनवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान प्राप्त करण्यासाठी 19.20 कोटी रुपये खर्च केला आहे. IGTL कंपनीने तांत्रिक सहकार्यासाठी संयुक्त उपक्रमांतर्गत 50 टक्के रक्कम म्हणजेच जवळपास 9.96 कोटी रुपये योगदान दिले आहे. ही देणी IGL आणि विकास लाइफ केअर कंपनीची उपकंपनी असलेल्या GGSPL ने IGTL या संयुक्त उपक्रमाच्या स्थापनेच्या वेळी जमा केलेल्या 37 कोटी रुपये निधीमधून दिली आहे.

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने संयुक्त अरब अमिरातीमध्ये 10 लाख दिनार अधिकृत भाग भांडवल असलेली विकास लाइफ केअर एलएलसी कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे 1000 शेअर्स प्रति शेअर 1000 दिनार या मूल्यावर जारी केले जातील. यासह कंपनीने सुरेश मेनन यांना नवीन कंपनीचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 05 February 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x