15 May 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sakuma Share Price | श्रीमंत बनवणाऱ्या 27 रुपयाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, यापूर्वी दिला 700% परतावा Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! DA पुन्हा 4% वाढणार, मूळ पगारात होणार असा बदल GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी
x

IREDA Share Price | श्रीमंत करणार हा शेअर! अवघ्या 47 दिवसात दिला 520 टक्के परतावा, पुढेही मजबूत परताव्याचे संकेत

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 204.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 47 दिवसांत आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 32 रुपये किमतीवरून वाढून 200 रुपयेच्या पार गेले आहे.

आयआरईडीए कंपनीचा IPO 32 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. तर 5 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 204.80 रुपये या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. IPO स्टॉक शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर या कंपनीच्या शेअर्सने स्पर्श केलेली नीचांकी किंमत पातळी 49.99 रुपये होती. तर आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 0.95 टक्के वाढीसह 206.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 520 टक्के वाढले आहेत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 30 रुपये ते 32 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 29 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंग झाल्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली झाली होती, मात्र नंतर हा स्टॉक सुसाट तेजीत वाढू लागला.

आयआरईडीए कंपनीच्या IPO चा एकूण आकार 2150.21 कोटी रुपये होता. या कंपनीचे शेअर्स एकूण 47 दिवसापैकी 31 दिवस तेजीत ट्रेड करत होते. डिसेंबर 2023 पर्यंत विविध 15 म्युच्युअल फंडानी या सरकारी कंपनीचे 2.87 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. या कंपनीचे 75 टक्के भाग भांडवल भारत सरकारने धारण केले आहेत. या कंपनीचा IPO एकूण 38.80 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

आयआरईडीए कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 7.73 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 24.16 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा एकूण 104.57 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 06 February 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x