15 May 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! DA पुन्हा 4% वाढणार, मूळ पगारात होणार असा बदल GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी
x

Patel Engineering Share Price | मंदीत संधी! 99 टक्क्यांनी घसरलेल्या शेअरने अल्पावधीत 1000 टक्के परतावा दिला

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग या पायाभूत सुविधा आणि बांधकाम सेवा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 79 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे.

पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवरून 99 टक्क्यांनी घसरल्यावर पुन्हा एकदा तेजीत आले होते. या कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षात 7 रुपये या आपल्या नीचांक किमतीवरून वाढून 79 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 2.23 टक्के घसरणीसह 74.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. विजय केडिया यांनी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 1.3 कोटी शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. 4 जानेवारी 2008 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 705.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण सुरू झाली. आणि 30 ऑगस्ट 2019 पर्यंत या कंपनीचे शेअर्स 7.19 रुपये किमतीवर आले होते.

मात्र मागील काही वर्षांत पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने पुन्हा तेजी पकडली आहे. या कंपनीचे शेअर्स आता 7.19 रुपये किमतीवरून 79 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ज्या लोकांनी 7.19 रुपये किमतीवर पटेल इंजिनिअरिंग स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 1000 टक्क्यांनी वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 13.15 रुपये होती.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार विजय केडिया यांनी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 13000000 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली होती. विजय केडिया यांनी आपल्या केडिया सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 1.68 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 425 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 14.75 रुपये किमतीवरून वाढून 79 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 6 महिन्यांत पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 57 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price NSE Live 07 February 2024.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x