15 May 2024 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये मोठी घसरण, पण तज्ज्ञांचा स्वस्तात खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून प्रचंड विक्रीचा दबाव पहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 47.38 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीचे लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने YTD आधारे आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. जेएम फायनान्शियल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 54 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 5.00 टक्के घसरणीसह 42.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. या तिमाहीत सुझलॉन एनर्जीने मागील वर्षीच्या तुलनेत 160 टक्के वाढीसह 203.04 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 78.28 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उसळी पाहायला मिळाली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 7 टक्के वाढली आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 430 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 9 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.96 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 64,332.97 कोटी रुपये आहे. सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 13 February 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x