21 May 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल?
x

Vallabh Steels Share Price | शेअरची किंमत 8 रुपये! 2 दिवसात दिला 20 टक्के परतावा, खरेदी करावा का?

Vallabh Steels Share Price

Vallabh Steels Share Price | वल्लभ स्टील्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. वल्लभ स्टील्स ही कंपनी मुख्यतः लोखंड आणि पोलाद उत्पादनांचा व्यवसाय करते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 7.98 रुपये किमतीवर पोहचले होते.

त्यापूर्वी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वल्लभ स्टील्स कंपनीचे शेअर्स 7.26 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 26 सप्टेंबर 2023 रोजी वल्लभ स्टील्स कंपनीचे शेअर्स 9.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी वल्लभ स्टील्स स्टॉक 9.94 टक्के वाढीसह 8.74 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

वल्लभ स्टील्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 9.11 रुपये होती. तर 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.43 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. वल्लभ स्टील्स कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत वल्लभ स्टील्स कंपनीला 0.43 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 3.26 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 376 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर NSE निफ्टी निर्देशांकाने 22,000 ची पातळी पार केली होती. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.68 टक्क्यांच्या वाढीसह आणि मिडकॅप निर्देशांक 0.78 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 227.55 अंकांच्या वाढीसह 72,050.38 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 70.70 अंकांच्या वाढीसह 21,910.75 अंकांवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vallabh Steels Share Price BSE Live 19 February 2024.

हॅशटॅग्स

Vallabh Steels Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x