18 May 2024 11:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून मजबूत टार्गेट प्राईस जाहीर

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 280 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 930 रुपये किमतीच्या पार गेले आहे. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.56 टक्के वाढीसह 931.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एंजेल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, चालू आर्थिक वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 845 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1,000 रुपये किमतीवर जातील. तर जेएम फायनान्शियल फर्मच्या तज्ञांनी देखील टाटा मोटर्स स्टॉकवर 1,000 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1,010 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. शेअर बाजारातील दिग्गज 11 गुंतवणूक सल्लागारांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, टाटा ग्रुप सोन्यापासून सॉफ्टवेअरपर्यंत अशा सर्व क्षेत्रात व्यवसाय करतो. टाटा समूहाचे एकूण बाजार भांडवल 365 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 30.30 लाख कोटी रुपये आहे. IMF च्या रिपोर्टनुसार पाकिस्तानचा GDP फक्त 341 अब्ज डॉलर आहे. एकाअर्थी पाहायला गेलो तर, आपल्या देशातील एकटा टाटा समूह संपूर्ण पाकिस्तान पेक्षा जास्त श्रीमंत आहे. एकट्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे बाजार भांडवल 15 लाख कोटी रुपये म्हणजेच जवळपास 170 अब्ज डॉलर्स आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 21 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x