19 May 2024 5:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

SJVN Share Price | अल्पावधीत 105 टक्के परतावा देणारा SJVN शेअर जोरदार तेजीत येणार, ऑर्डरबुक मजबूत झाली

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर 7 टक्क्यांच्या वाढीसह 127.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच एसजेव्हीएन कंपनीने जम्मू आणि काश्मीर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीसोबत 300 मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा पुरवठा करण्याचा करार केला आहे.

एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 170.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 30.39 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 1.58 टक्के वाढीसह 122.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, एसजेव्हीएन कंपनीच्या एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड या उपकंपनीने जम्मू आणि काश्मीर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीसोबत 300 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचा करार संपन्न केला आहे.

जम्मू-काश्मीर पॉवर कॉर्पोरेशन कंपनीला 300 मेगावॅट वीज निर्माणाधीन 1000 मेगावॅट क्षमतेच्या बिकानेर सौर प्रकल्पातून पुरविली जाणार आहे. बिकानेर सौर ऊर्जा प्रकल्प 5491 कोटी रुपये गुंतवणूक करून उभारला जात आहे. हा प्रकल्प घरगुती विजेची गरज पूर्ण करण्यासाठी विकसित केला जात आहे. या प्रकल्पाचे काम जुलै 2024 पर्यंत पूर्ण होईल.

मागील एका वर्षात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 295 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 फेब्रुवारी 2023 रोजी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 31.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 26 फेब्रुवारी 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 127.55 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील 6 महिन्यांत एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 105 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 60.80 रुपयेवरून वाढून 127.55 रुपये किमतीवर गेले आहेत. 2024 या वर्षात आतापर्यंत एसजेव्हीएन स्टॉक 35 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील 3 वर्षात SJVN लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 385 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 25.50 रुपयेवरून वाढून 127.55 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 27 February 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x