14 May 2024 10:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Penny Stocks | शेअरची किंमत 9 रुपये! 2 आठवड्यात 40 टक्के परतावा दिला, वेळीच खरेदी करावा

Penny Stocks

Penny Stocks | सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक श्रेणीत ट्रेड करत आहेत. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते, मात्र उच्च जोखीम घेणारे गुंतवणुकदार अल्प काळासाठी पेनी स्टॉक खरेदी करून मजबूत कमाई करत असतात. सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. Softrak Venture Investment Ltd Share Price

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 9.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 9.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील वर्षी 2 मार्च 2023 रोजी सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 11.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण सुरू झाली. 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.04 रुपये किमतीवर आले होते. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमवून दिला आहे.

मागील दोन आठवड्यांत या पेनी स्टॉकची किंमत 40 टक्के वाढली आहे. YTD आधारे सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकाचा वाटा शून्य असून सर्व भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहे.

सॉफ्टट्रक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट कंपनीची स्थापना 1993 साली झाली होती. ही कंपनी NBFC तसेच IT क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या कार्यात बदल घडवून आणण्यासाठी आणि आयटी सेवा वापरण्यास सक्षम बनवण्याचे काम करते.

सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या वेबसाइटनुसार ही कंपनी आपल्या ग्राहकांना मायक्रोसॉफ्ट एएसपी, NET, Java, JavaScript, PHP, मुक्त स्रोत, Android आणि iOS OS, MySQL सारख्या सॉफ्टवेअर संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks Softrak Venture Investment Ltd Share Price 27 February 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(467)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x