22 May 2024 8:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक, हा स्वस्त शेअर वेळीच खरेदी करा, 15 दिवसात 2 ऑर्डर, संयम श्रीमंत करेल

HFCL Share Price

HFCL Share Price | काही महिन्यांपासून तेजीत धावणाऱ्या एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली सुरू झाली आहे. आज या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. अवघ्या 15 दिवसात एचएफसीएल कंपनीने दुसरी मोठी ऑर्डर मिळवली आहे. नुकताच एचएफसीएल कंपनीला ऑप्टिकल फायबर केबलची एक ऑर्डर मिळाली आहे.

दोन आठवड्यांपूर्वी एचएफसीएल कंपनीला बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने 141 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएफसीएल कंपनीचे शेअर 2 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या एचएफसीएल कंपनीचे शेअर्स 4.43 टक्के घसरणीसह 107.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचएफसीएल कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, भारतातील एका आघाडीच्या दूरसंचार कंपनीने ऑप्टिकल फायबर केबल्ससाठी मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 40.36 कोटी रुपये आहे. या ऑर्डरची पूर्तता जून 2024 पर्यंत करायची आहे. 13 फेब्रुवारी 2024 रोजी एचएफसीएल कंपनीला BSNL कडून 141 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर 179 कोटी रुपये मूल्याच्या ऍडवान्स खरेदी ऑर्डरचा भाग होती.

ही ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 38 कोटी रुपयेची वेगळी ऑर्डर दिली जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. डिसेंबर तिमाहीत एचएफसीएल कंपनीचा नफा 79.9 कोटी रुपयेवरून कमी होऊन 77.92 कोटी रुपयेवर आला आहे. तर कंपनीची विक्री 1002 कोटीं रुपयेवरून कमी होऊन 954.47 कोटी रुपये नोंदवली गेली आहे.

एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 3 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य चौपट वाढले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या 77 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 72 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्के वाढली आहे. तर मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HFCL Share Price NSE Live 28 February 2024.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x