19 May 2024 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

JTL Industries Share Price | कुबेर कृपा असलेला शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 8000 टक्के परतावा, शेअर प्राईसही स्वस्त

JTL Industries Share Price

JTL Industries Share Price | जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह 260 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले आहे. जेटीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या सिक्युरिटीज इश्यू आणि ॲलॉटमेंट समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ( जेटीएल इंडस्ट्रीज अंश )

या बैठकीत कंपनीने सार्वजनिक श्रेणीतील गैर-प्रवर्तक गुंतवणूकदारांना परिवर्तनीय वॉरंटच्या बदल्यात शेअर्सचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4600 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के घसरणीसह 259.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जेटीएल इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील सर्वात मोठी स्टील ट्यूब उत्पादन करणारी कंपनी मानली जाते. या कंपनीकडे चार अत्याधुनिक उत्पादन केंद्र, 10 ब्रँड आणि सात उत्पादने आहेत. जेटीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 29.48 लाख परिवर्तनीय वॉरंटच्या बदल्यात कंपनीचे शेअर्स वाटप केले आहे. हे परिवर्तनीय वॉरंट जारी केल्यानंतर, जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यामुळे परिवर्तनीय वॉरंटच्या बदल्यात वॉरंट खरेदी करणाऱ्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्सचेही वाटप करण्यात आले आहे.

सध्या जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण पेड अप इक्विटी कॅपिटल 35.40 कोटी रुपये आहे. नवीन शेअर्सचीही स्थिती जुन्या इक्विटी शेअर्ससारखीच आहे. जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीची अपडेट दिली आहे. या तिमाहीत कंपनीची विक्री 65 टक्क्यांच्या वाढीसह 567 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. आणि कंपनीचा निव्वळ नफा 47 टक्क्यांच्या वाढीसह 30.18 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील 3 वर्षांत जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8000 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील दहा वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4600 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JTL Industries Share Price NSE Live 01 March 2024.

हॅशटॅग्स

JTL Industries Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x