15 May 2024 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

NTPC Share Price | एनटीपीसी शेअर नवीन उच्चांकी पातळीवर पोहचला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर

NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 357.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनटीपीसी या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स 359 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. तर आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 1.88 टक्के घसरणीसह 351.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( एनटीपीसी लिमिटेड अंश )

आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मने एनटीपीसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. शेअर बाजारातील जवळपास 19 तज्ञांनी एनटीपीसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकची टार्गेट प्राइस अपग्रेड करून 400 रुपये निश्चित केली आहे.

नोव्हेंबर 2023 पासून एनटीपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत होती. नोव्हेंबर 2023 मध्ये या कंपनीचे शेअर 235 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवारच्या व्यवहारात स्टॉकने 359 रुपये उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

NTPC ही भारतातील एकमेव कंपनी आहे जिने मागील 5 वर्षांत कोळसा आधारित वीज निर्मिती क्षमता वाढवून 73000 मेगावॅट क्षमतेचा स्थापित ऊर्जा निर्मितीचा टप्पा पार केला आहे. एनटीपीसी कंपनीचे 9300 मेगावॅट क्षमतेचे कोळसा प्रकल्प अजूनही निर्माणाधीन असून ते आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एनटीपीसी ही सरकारी वीज निर्मिती करणारी कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस लाभांश देण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. मागील महिन्यात या, कंपनीने 2023-24 आर्थिक वर्षासाठी 10 रुपये दर्शनी मुख्य असलेल्या शेअर्सवर 22.50 टक्के म्हणजेच 2.25 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप केला होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देखील, कंपनीने 10 दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 72.50 टक्के म्हणजे प्रति शेअर 7.25 रुपये लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NTPC Share Price NSE Live 06 March 2024.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x