15 May 2024 2:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Tata Chemicals Share Price | टाटा तिथे नो घाटा! 5 दिवसांत दिला 25 टक्के परतावा, पुन्हा 12% वाढला, खरेदी करणार?

Tata Chemicals Share Price

Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13.2 टक्के वाढीसह 1202.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. ( टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनी अंश )

मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रेटिंग्स एजन्सीने या कंपनीची रेटिंग अपग्रेड केली आहे. आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी टाटा केमिकल्स लिमिटेड स्टॉक 12.02 टक्के वाढीसह 1,320.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फिंच रेटिंग फर्मने टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनीचे दीर्घकालीन IDR रेटिंग ‘पॉझिटिव्ह’ वरून ‘स्थिर’ असे केले आहे. तसेच त्यावर ‘BB+’ रेटिंग देण्यात आली आहे. मागील तिमाहीत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोडा ॲशच्या मागणीत घट पाहायला मिळाली होती. युरोप आणि यूएसमधील कंटेनर ग्लास आणि फ्लॅट ग्लास मधील मागणी घटल्याने सोडा ॲशच्या किमतींवर दबाव होता.

टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने निवेदनात माहिती दिली आहे की, सध्याची मागणी-पुरवठ्यातील मंदीची परिस्थिती अल्प काळासाठी स्थिर राहील. टाटा केमिकल्स लिमिटेड ही जगातील तिसरी सर्वात मोठी सोडा ॲशची उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. आर्थिक वर्ष 2025-2027 दरम्यान टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनीचा EBITDA निव्वळ लीव्हरेज सरासरीच्या 2.2x पट राहण्याचा अंदाज आहे. पुढील काळातील उद्योगात निर्माण होणाऱ्या दबावांना न जुमानता टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनी आपल्या रेटिंगशी सुसंगत कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Chemicals Share Price today on 7 March 2024

हॅशटॅग्स

Tata Chemicals Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x