25 May 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रासह हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंगसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट Vodafone Idea Share Price | अप्पर सर्किटनंतर पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, मिळेल 80 टक्केपर्यंत परतावा Adani Port Share Price | ब्रेकआऊटचे संकेत! तज्ज्ञांकडून अदानी पोर्ट्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मोठी कमाई होणार SBI Special FD Interest | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! खास FD वर मिळेल मोठा व्याजदर, मिळेल तगडा परतावा Quant Mutual Fund | शेअर्स नव्हे! या आहेत मालामाल करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, सेव्ह करून ठेवा यादी My EPF Money | पगारदारांनो! EPF खात्यात पैसे असतील तर हे लक्षात घ्या, अन्यथा पसे काढताना अडचणी येतील
x

Adani Green Share Price | सरकारची एक घोषणा, मल्टिबॅगर अदानी ग्रीन एनर्जी शेअर्स तेजीत येणार, काय आहे अपडेट?

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने सेबीला माहिती दिली की, त्यांनी गुजरातमधील खवरा आरई पार्क येथे 1,000 मेगावॅट सौर उर्जेचे उत्पादन सुरू केले आहे. ( अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश )

त्यामुळे सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 1982 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र अदानी ग्रीन एनर्जी स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 1.24 टक्के घसरणीसह 1,906.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, “अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची ऑपरेटिंग क्षमता 9,478 मेगावॅटवर पोहचली आहे. कंपनी 2030 पर्यंत 45,000 मेगावॅट क्षमतेचे लक्ष सध्या करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने गुजरातमधील खवरा प्रकल्प सुरू केल्यानंतर अवघ्या 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 1,000 मेगावॅटची वीज निर्मिती क्षमता साध्य केली आहे”.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनी भारतात जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प 538 चौरस किलोमीटर क्षेत्रावर उभारणार आहे. या प्रकल्पाचा आकार पॅरिस शहराच्या 5 पट अधिक मोठा असेल. या प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती क्षमता 30 गिगावॉट असेल. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 5 वर्ष कालावधी लागणार आहे. हा प्रोजेक्ट पूर्णपणे कार्यान्वित झाल्यास 15,200 लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. सध्या भारत सरकारने देखील हरित ऊर्जेला मोठ्या प्रमाणत प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. आता सरकारने देशात एक कोटी घरांवर सौर पॅनेल बसवण्याची योजना जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 12 March 2024.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x