18 May 2024 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Praveg Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल, 5 वर्षात दिला 38,000 टक्के परतावा, करोडोत कमाई

Praveg Share Price

Praveg Share Price | प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी सुरुवातीच्या काही तासात मजबूत तेजीसह वाढत होते. गोल्डमन सॅक्स इंडिया इक्विटी पोर्टफोलिओने प्रवेग लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याची बातमी प्रसिद्ध होताच स्टॉक तेजीत आला होता. मात्र दिवसा अखेर हा स्टॉक प्रॉफिट-बुकिंगला बळी पडला. प्रवेग लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक पटेल आशाबेन विष्णुकुमार यांनी आपले 2.85 टक्के भाग भांडवल विकले आहे. ( प्रवेग लिमिटेड कंपनी अंश )

कंपनीच्या प्रवर्तक गटातील सदस्य विष्णुकुमार यांनी देखील आपले 7 लाख इक्विटी शेअर्स सरासरी 850.51 रुपये किमतीवर विकले. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली. आज बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.13 टक्के घसरणीसह 852.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार Goldman Sachs India Equity Portfolio ने प्रवेग लिमिटेड कंपनीचे 2.18 भाग भांडवल खरेदी केले आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स 12 मार्च रोजी 5 टक्क्यांनी वाढले होते. व्यवहारादरम्यान हा स्टॉक 967.85 रुपये किमतीवर पोहोचला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 111 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील पाच वर्षांत प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 38,000 टक्के नफा कमावला आहे. प्रवेग लिमिटेड ही कंपनी मुख्यतः मुख्यत्वे इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करते. अलीकडेच ही कंपनी हॉस्पिटॅलिटी आणि ऑपरेशन मॅनेजमेंट क्षेत्रात देखील उतरली आहे. नुकताच या कंपनीने अयोध्या आणि लक्षद्वीपमध्ये टेन्ट सिटी उभारणी केली होती.

प्रवेग लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 33.07 कोटी रुपये मूल्याची विक्री नोंदवली होती. डिसेंबर 2022 मध्ये कंपनीची विक्री 28.38 कोटी रुपये नोंदवली गेली होती. डिसेंबर तिमाहीत प्रवेग लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 30 टक्क्यांच्या घसरणीसह 8.10 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या तिमाहीत कंपनीचा EBITDA 13.27 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

प्रवेग लिमिटेड ही कंपनी मुख्यतः हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी अयोध्या, कच्छचे रण, वाराणसी, दमण आणि दीव आणि सरदार सरोवर यासह विविध ठिकाणी लक्झरी टेंट सिटी आणि लक्झरी रिसॉर्ट चालवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे जवळपास 50.76 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 49.24 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Praveg Share Price NSE Live 13 March 2024.

हॅशटॅग्स

Praveg Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x