19 May 2024 7:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Xpro India Share Price | कुबेर कृपा असणारा शेअर! गुंतवणुकदार करोडपती झाले, 4 वर्षात 1 लाखाचे 1.02 कोटी झाले

Xpro India Share Price

Xpro India Share Price | एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. ( एक्सप्रो इंडिया कंपनी अंश )

अवघ्या तीन वर्षात या कंपनीचे शेअर्स 48.70 रुपयेवरून वाढून 1,077 रुपये किमतीवर पोहचले आहेत. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांनी 2111 टक्के नफा कमावला आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी एक्सप्रो इंडिया स्टॉक 5.56 टक्के वाढीसह 1,090.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील चार वर्षांत एक्सप्रो इंडिया कंपनीचे शेअर्स तब्बल 10000 टक्के मजबूत झाले आहेत. चार वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 10.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही चार वर्षांपूर्वी एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.02 कोटी रुपये झाले असते. 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,297 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते.

एक्सप्रो इंडिया ही कंपनी मुख्यतः पॉलिमर प्रक्रिया क्षेत्रात व्यवसाय करते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये एक्सप्रो इंडिया कंपनीचे 3.67 टक्के शेअर्स आहेत. या कंपनीने डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे.

आर्थिक वर्ष 2023 मधील तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 96.1 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 93.1 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर तिमाहीत या कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 55 टक्के वाढीसह 10.07 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Xpro India Share Price NSE Live 14 March 2024.

हॅशटॅग्स

#Xpro India Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x