9 May 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Salasar Techno Share Price | शेअरची किंमत 20 रुपये, अप्पर सर्किट हिट झाला, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली

Salasar Techno Share Price

Salasar Techno Share Price | सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी-मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनी अंश )

सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने बुधवारी अपडेट दिली की, त्यांना तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 1034 कोटी रुपये मूल्याच्या सात विविध कामांची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आज हा स्टॉक तेजीत वाढत आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.57 टक्के वाढीसह 20.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीला तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन कंपनीने तामिळनाडूतील कोईम्बतूर याठिकाणी सर्वसमावेशक टर्नकी सेवा प्रदान करण्याचे काम दिले आहे. सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी तामिळनाडू राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करणार आहे. तामिळनाडूच्या तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेंगलपट्टू, करूर शहरी, करूर ग्रामीण विभाग, कृष्णगिरी जिल्हा, वेल्लोर जिल्ह्यातील पल्लीकोंडा, वेल्लोर आणि कटपाडी विभाग आणि विल्लुपुरम जिल्ह्यातील गिंगी यांठिकाणी कामाची सुरुवात करणार आहे.

सालासर कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने माहिती दिली की, “कंपनीला 1034 कोटी रुपये मूल्याच्या विविध प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. हा कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या व्यवसाय वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. यामुळे कंपनीचे अभियांत्रिकी आणि पायाभूत क्षेत्रातील स्थान मजबूत होणार आहे”. सालासर टेक्नो इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारी पाच टक्के घसरणीसह 19.67 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करतोय.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Salasar Techno Share Price NSE Live 14 March 2024.

हॅशटॅग्स

Salasar Techno Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x