15 May 2024 4:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

IREDA Share Price | आयआरईडीए शेअर्स या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.30 टक्क्यांच्या वाढीसह 133 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )

आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 214.80 रुपये होती. आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 2.67 टक्के घसरणीसह 125.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांनी आयआरईडीए स्टॉक खरेदी करताना 119 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स जर 143 रुपयेच्या पुढे गेले तर 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यावर या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. काही आठवड्यात हा स्टॉक 215 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 32 रुपये होती. आणि शेअर 50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता.

नुकताच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी एका निवेदनात म्हंटले आहे की, “कंपनी B2C विभागाशी संबंधित रूफटॉप सोलर, PM-KUSUM, इलेक्ट्रिक आणि किरकोळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका उपकंपनीची स्थापना करण्याचा विचार करत आहे. आयआरईडीए कंपनी भारत सरकारच्या मंजुरीनंतर रिटेल सेक्टरमध्ये व्यवसाय विस्तार करण्यासाठी 100 टक्के मालकीची एक उपकंपनी स्थापन करेल”.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 20 March 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x