14 May 2024 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार?

Adani Port Share Price

Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलच्या मते, पुढील काळात अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स मजबूत वाढू शकतात. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनी अंश )

जेएम फायनान्शियल फर्मने अदानी पोर्ट्स स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स 1,460 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. काल गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के वाढीसह 1,342.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

नुकताच अदानी पोर्ट्स कंपनीने 3,350 कोटी रुपये मूल्याचा एक करार केला आहे. या करारांतर्गत कंपनीने गोपालपूर बंदरातील 95 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. या घोषणेनंतर, ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे.

अदानी पोर्ट्स कंपनीने शापूरजी पालोनजी ग्रुप आणि ओडिशा स्टीवेडोरेस लिमिटेड कंपनीकडून ओडिशाच्या गोपालपूर पोर्ट्समधील 95 टक्के भाग भांडवल अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. हे अधिग्रहण 3350 कोटी रुपये एंटरप्राइझ मूल्यावर होणार आहे.

अदानी पोर्ट्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, अदानी पोर्ट्स कंपनी गोपालपूर पोर्ट लिमिटेड कंपनीमधील एसपी ग्रुपचे संपूर्ण 56 टक्के आणि ओएसएल गृपचे 39 टक्के भागभांडवल खरेदी करणार आहे. OSL गृप पाच टक्के भाग भांडवल धारण करून संयुक्त उपक्रम भागीदार म्हणून कंपनीत असेल. या अधिग्रहणामुळे अदानी पोर्ट्स कंपनीचा विद्यमान बंदरांशी समन्वय वाढेल आणि पूर्व किनारपट्टीवरील कंपनीची उपस्थिती आणखी मजबूत होण्यास मदत होईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE Live 29 March 2024.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x