15 May 2024 9:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीकडून सकारात्मक अपडेट, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत, किती फायदा होणार?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या सरकारी कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 24,200 कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )

स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगमध्ये कंपनीने माहिती दिली आहे की, आयआरईडीए कंपनी विविध बाँड, शाश्वत कर्ज साधन, मुदत कर्ज, कमर्शिअल पेपर आणि बाह्य व्यावसायिक कर्ज उभारणी करून निधी जमा करणार आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.18 टक्के घसरणीसह 135.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

भारत सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 27 मार्च रोजी कंपनीच्या टेक्निकल विभागाच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार 5 मार्च 2024 पासून पुढील 6 महिन्यांसाठी आयआरईडीए कंपनीच्या वित्त विभागाचे संचालक विजय कुमार मोहंती यांना सोपवला आहे. यापूर्वी आयआरईडीए कंपनीच्या तांत्रिक विभागाच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार 4 मार्च 2024 पर्यंत आयआरईडीए कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी हाताळला होता.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 0.18 टक्क्यांनी घसरले होते. दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 135.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयआरईडीए कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 214.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 50 रुपये होती. मागील एका वर्षभरात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 126.25 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 30 March 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x