19 May 2024 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Reliance Power Share Price | शेअरची किंमत 31 रुपये, स्वस्त शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मालामाल करणार हा स्टॉक

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. एकेकाळी जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत असलेले अनिल अंबानी कर्जाच्या जाळ्यात अडकले आणि त्यांच्या कंपन्याच्या शेअरमध्ये घसरण सुरू झाली. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

एक वेळ तर अशी आली होती की, त्यांच्या काही कंपन्याचे शेअर्स अवघ्या काही पैशांवर ट्रेड करत होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. अनिल अंबानी यांनी आपल्या कंपन्यावरील कर्ज परतफेड करण्यास सुरुवात केली आहे. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.29 टक्के घसरणीसह 31.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा या दोन्ही कंपन्यांनी आपले कर्ज परतफेड केले आहेत. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले होते. रिलायन्स पॉवर स्टॉक मागील आठवड्यात गुरुवारी 4.87 टक्के वाढीसह 33.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

1 एप्रिल 2024 पासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत होते. मागील पाच दिवसांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीपासून 99 टक्के खाली आले होते.

16 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 260.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर मार्च 2020 मध्ये हा स्टॉक 1 रुपये किमतीवर आला होता. या किमतीवरून शेअर्सने 2500 टक्के रिकव्हरी केली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13420 कोटी रुपये आहे.

रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स देखील मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11690 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 2.02 टक्के घसरणीसह 292.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 08 April 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x