4 May 2024 9:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

IREDA Share Price | आयआरईडीए शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञ उत्साही, मोठी टार्गेट प्राइस जाहीर

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. या कंपनीचा IPO मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची किंमत IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 5 पट अधिक वाढली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.45 टक्के वाढीसह 167.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमध्ये 180 रुपये किमीच्या जवळ मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. आणि 160 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 180 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 200 रुपये ते 210 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 24 टक्के अधिक वाढू शकतो. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 150 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये आयआरईडीए कंपनीचा IPO स्टॉक 32 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासुन आतपर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 425 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे 50 टक्के वाढवले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 1253 कोटी रुपये निव्वळ विक्री नोंदवली होती. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ विक्रीत 44 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 67 टक्के वाढीसह 335 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 13 April 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x