16 May 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500 Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय
x

Yes Bank Share Price | येस बँकबाबत आली सकारात्मक अपडेट, नवीन अपडेटचा 24 रुपयाच्या शेअरला फायदा होणार?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून पडझड पाहायला मिळत आहे. जपानस्थित मित्सुबिशी UFG फायनान्शियल ग्रुप आणि सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने येस बँकेमध्ये गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार या दोन्ही जपानी गुंतवणुकदार कंपन्यांनी येस बँकेचे बहुसंख्य भाग भांडवल खरेदी करण्याची योजना आखली आहे. ( येस बँक अंश )

स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँकेचे शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय बँकेने येस बँकेला चार वर्षांपूर्वी दिवाळखोर होण्यापासून वाचवले होते. आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.62 टक्के घसरणीसह 24.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जपानस्थित गुंतवणूक संस्था मित्सुबिशी UFG फायनान्शियल ग्रुप आणि सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने भारतीय बाजारात आपली उपस्थिती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गुंतवणूक संस्थांना येस बँकेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आरबीआयची मंजुरी घ्यावी लागेल.

येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 69,762 कोटी रुपये आहे. याचा अर्थ बँकेच्या 51 टक्के भाग भांडवलाचे मूल्य 35,578 कोटी रुपये असेल. सध्या येस बँकेची सर्वात मोठी गुंतवणुकदार SBI बँक आहे. येस बँकेत SBI ने 26.13 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

येस बँकेमध्ये एलआयसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांनी मिळून 13.84 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. येस बँक आपल्या व्यवसाय वाढीसाठी लघु आणि मध्यम कंपन्यांना कर्ज वाटप करण्याची योजना आखत आहे. सध्या येस बँकेने आपले लक्ष नफा वाढवण्यावर केंद्रित केले आहे.

सध्या येस बँकेकडे पुरेसे भांडवल असून बँकेच्या ठेवी देखील वाढत आहेत. येस बँकेचा व्यावसायिक पोर्टफोलिओ देखील चांगला होत आहे. विशेष बाब म्हणजे येस बँकेने आपले एनपीए एका मालमत्ता पुनर्रचना कंपनीला विकले आहे. डिसेंबर 2022 मध्ये येस बँकेने JC फ्लॉवर्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला 48,000 कोटी रुपये मूल्याचे NPA विकले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 15 April 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x