21 May 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत एक मोठी अपडेट आली आहे. जीक्यूजी पार्टनर कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष राजीव जैन व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक करू शकतात, अशी बातमी मिळत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

राजीव जैन व्होडाफोन आयडिया कंपनीच्या FPO मध्ये 400 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. भारतीय चलनात ही रक्कम 3280 कोटी रुपये होते. GQG पार्टनर कंपनीने व्होडाफोन आयडिया कंपनीच्या FPO मध्ये 400 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.90 टक्के घसरणीसह 12.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

तज्ञांच्या मते, जीक्यूजी पार्टनर कंपनीने जर व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये गुंतवणूक केली, तर कंपनीला जबरदस्त फायदा होऊ शकतो. व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या FPO च्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशातून 5G सेवा सुरू करणार आहे. यापूर्वी जीक्यूजी पार्टनर कंपनीने अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून अदानी समूहाला खूप मोठी मदत केली होती.

जीक्यूजी पार्टनर कंपनीचे चेअरमन राजीव जैन यांनी स्विस कंपनी व्होंटोबेल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये देखील सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून काम केले आहे. 1994 मध्ये ते व्होंटोबेल कंपनीमध्ये रुजू झाले होते.

राजीव जैन यांनी गुंतवणूकीच्या व्यवसायात तब्बल 23 वर्ष काम केल्यानंतर जीक्यूजी पार्टनर कंपनीची स्थापना केली होती. राजीव जैन हे या कंपनीचे अध्यक्ष आणि CIO आहेत. जीक्यूजी पार्टनर ही कंपनी जगातील आघाडीची गुंतवणूकदार संस्था आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार जीक्यूजी पार्टनर कंपनी 92 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त मालमत्ता व्यवस्थापित करत आहे.

या कंपनीचे बहुतांश शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे आहेत. जीक्यूजी पार्टनर कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील फ्लोरिडा येथे स्थित असून कंपनीचे इतर कार्यालय न्यूयॉर्क, लंडन, सिएटल आणि सिडनी येथे देखील स्थित आहेत. जीक्यूजी पार्टनर ही कंपनी ऑस्ट्रेलियामध्ये सिक्युरिटीज एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 17 April 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x