29 April 2024 9:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

मोदी'जी पार्ले'जी' सुद्धा संकटात! १० हजार कर्मचाऱ्यांची कपात होणार

Layoff, Parle G, Slowing Demand, Unemployment

मुंबई : रिटेलसह वाहन उद्योग क्षेत्रातील मंदीचा फटका कामगारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, आता बिस्कीटांचं उत्पादन घेणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा सामना करावा लागत आहे. मागणी घटल्यानं आगामी काळात ८ ते १० हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. पारले जी कंपनीत सध्या एक लाख कामगार काम करतात.

भारतीय अर्थव्यवस्थेत घट झाल्यामुळे देशातील मोठ्या उद्योगधंद्यांवर त्याचा परिमाण झाला आहे. सन २०१८-१९ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ६.८ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यानंतर, गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि अर्थतज्ञांची याबाबत चर्चा केली. मात्र, औद्यागिक क्षेत्रात या मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि तेथील कर्मचाऱ्यांना होत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात लाखो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावल्यानंतर आता आणखी १० हजार कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार आहे. प्रसिद्ध बिस्कीट ब्रँड पारले जी, मोनॅको, मिलानो, हाईड अँड सीक बिस्कीट आणि मँगो बाईट टॉफिजचा यांची एकत्रित उलाढाल जवळपास १०,००० कोटी रुपयांची आहे.

‘आम्ही १०० रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून कमी किंमतीच्या बिस्किटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. सामान्यतः ५ रुपये किंवा त्याहून कमी किंमतीच्या पाकिटातून यांची विक्री होते. पण जर सरकारने मागणी मान्य केली नाही तर आमच्या विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या ८ ते १० हजार जणांना कामावरुन कमी करावं लागेल. विक्री घटल्याचा मोठा तोटा कंपनीला सहन करावा लागत आहे’, असं कंपनीचे कॅटेगरी हेड मयंक शाह यांनी सांगितलं. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x