29 April 2024 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

विधानसभा निवडणूक: एकट्या पुण्यात भाजपाची १०० जणांची सोशल मीडिया वॉर रूम

Vidhansabha Election 2019, Assembly Election 2019, BJP IT Cell

पुणे: २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने समाज माध्यमांचा मोठ्याप्रमाणावर वापर केला होता. सोशल मिडीयावर केलेल्या प्रचाराचा फायदा घेत घवघवीत यश मिळाले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडनुकीसाठी सुद्धा भाजपची वॉर रूम सज्ज झाली असून समाज माध्यमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मिडिया टीम पोहोचणार असून आठही मतदारसंघांसाठी हि टीम एकत्र काम करणार आहे. अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली आहे..पक्ष्याच्या शहरातील मुख्यालयातून या वॉर रूमचे काम चालणार आहे. तसेच ही वॉर रूम प्रदेश आणि केंद्रीय वॉर रूमला संलग्न असणार आहे. सुमारे १०० युकांची टीम सोशल मिडीयाच काम करणार आहेत. तिहेरी तलाक रद्द करणे, कलम ३७० रद्द करणे, चांद्रयान, मेट्रो, पीएमआरडीचा विकास आराखडा, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण, नव्या ई-बस, झोपडपट्टी पुनर्विकास आदींबाबत घेतलेल्या प्रमुख निर्णयांचीही माहिती मतदारांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

दरम्यान जानेवारी महिन्यात महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल प्रमुख आशिष मरखेड हा प्रसार माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या बनवून ते समाज माध्यमांवर पसरवताना पकडला गेला होता. विशेष एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या ८ जानेवारीच्या राहुल गांधी याच्या मूळ बातमी मध्ये धार्मिक बदल करून ती स्वतःच्या अधिकृत ट्विटरवरून प्रसिद्ध करताना पकडला गेला होता.

वास्तविक राहुल गांधी यांच्या मुलाखती विषयीची एक ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध करण्यात करण्यात आली होती. मात्र एबीपी न्यूजच्या त्या मूळ फ्लॅश न्यूजच्या स्क्रीनशॉटमध्ये फोटोशॉप करून त्यात राहुल गांधी जे बोलले नव्हते ते मुस्लिमांशी संबंधित वाक्य बनवून त्याला स्वतःच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केलं होतं.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x