26 April 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करु नका: पवारांचा स्वपक्षिय मंत्र्यांना सल्ला

NCP, Sharad Pawar

मुंबई: राज्यात तीन पक्षांचे मिळून संयुक्त सरकार असल्याने मंत्र्यांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (ता.8) पक्षाच्या मंत्र्यांना केली. आपल्या मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करु नका. विकासकामे करताना त्यांना विश्वासात घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर पवार यांनी बुधवारी पहिल्यांदाच पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्र्यांना मार्गदर्शन करताना पवारांनी राज्यासमोरील आव्हानांचा धांडोळा घेताना शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीकडे प्राधान्याने लक्ष देण्याची सूचना केली. नव्या मंत्र्यांना मंत्रालयातील कामकाज तसेच प्रशासकीय यंत्रणेची माहितीही पवार यांनी दिली.

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आटोपल्यानंतर सायंकाळी यशवंत प्रतिष्ठाण येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा वर्गच खा. पवार यांनी घेतला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी स्वत:साठी आचारसंहिता तयार केली पाहिजे. मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी कसे काम केले पाहिजे, मंत्रालयात किती दिवस हजर राहायचे, मतदारसंघात कधी जायच, अशा सूचनाही देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी स्वत: साठी आचारसंहिता तयार केली पाहिेजे. मंत्रालयातील कामकाजात लक्ष ठेवावे, मंत्रालयात किती दिवस हजर रहायचे. मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी कसं काम करायला हवं. मतदारसंघात कधी जायचं, असे अनेक प्रकारचे मोलाचे सल्ले पवारांनी मंत्र्यांना दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 

Web Title:  Do not Succumb Temptations NCP President Sharad Pawars advice to NCP Ministers.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x