27 April 2024 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या; मनसेचा NRC'ला पाठिंबा

MNS Chief Raj Thackeray, MNS Maha Adhiveshan, NRC, CAA

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.

त्यानंतर, राज ठाकरे यांनी झेंडा आवडला का? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. ते म्हणाले, येत्या ९ मार्चला पक्षाला २४ वर्षे होतील. आम्ही सर्व काही दिवसांपासून विचार करत होतो की पक्षाचं एक अधिवेशन घेणं गरजेचं आहे. सभा ज्यावेळी होते त्यावेळी सर्व एकत्र येतातच. मात्र, अधिवेशन होतं तेव्हा राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी एकत्र येतात वेळ घालवतात. तसंही अधिवेशनाची परंपरा कमी होत आहे असं राज ठाकरे म्हणाले.

मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून आणि धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. जे इथे येऊन धिंगाणा घालणार तर मी आडवाच जाणार. रझा अकादमीच्या मोर्चाच्यावेळी आमच्या पोलिसांवर हात टाकला होता त्यावेळी मोर्चा काढणार पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना होता. हिंदी सिनेसृष्टीत पाकिस्तानी कलाकार धिंगाणा घालत होते. त्यावेळी त्यांना हाकलण्याचं काम मनसेनं केलं. त्यावेळी कोणी मला हिंदुत्वाच्या मार्गाने चाललोय हे विचारलं नाही असा सवाल राज यांनी केला.

दरम्यान, राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये देशविरोधी कट शिजत आहे. याची माहिती देण्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेईन, असं मनसे प्रमुख यांनी पक्षाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात म्हटलं. पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांना हाकलून द्या. त्यासाठी माझा मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

तत्पूर्वी, – मनसे सरचिटणीस किशोर शिंदे यांनी दुसऱ्या सत्राला सुरुवात करत शहर व नियोजन यावर ठराव मांडला, यामध्ये घुसखोरांना देशाबाहेर हाकला, अनाधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यवस्थेला दणका देण्याची मोहीम राबविण्यात येईल असा ठराव मांडत अप्रत्यक्षपणे एनआरसीला पाठिंबा दिला आहे.

 

Web Title:  MNS Raj Thackeray Support NRC in Maha Adhiveshan Speech.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x