27 April 2024 2:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अमित शहा! करंट लगा क्या?...दिल्लीत आप कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकावले

AAP party, Amit Shah, Delhi Assembly Election 2020 Result

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत विजयाची हॅट्रिक करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आतापर्यंतच्या कलानुसार दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांपैकी आम आदमी पार्टी ५८ आणि भारतीय जनता पक्ष १२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

सीएएच्या विरोध प्रदर्शनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शाहीन बागच्या ओखला मतदार संघाबद्दल बोलायचं तर इथं आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्लाह खान यांनी विजय मिळवलाय. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ब्रह्म सिंह यांना पराभूत केलंय. अमानतुल्लाह यांनी ब्रह्म सिंह यांच्यापेक्षा तब्बल २८५०१ मतांच्या फरकानं विजय मिळवलाय.

आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते नाचतगाजत हे पोस्टर झळकावत आहेत. दिल्लीतल्या शाहीन बागचा मुद्दा हा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रस्थानी होता. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केला होता. एका सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले होते, दिल्लीकरांनो ईव्हीएमचं बटण एवढ्या जोरानं दाबा की मत इकडे मिळेल आणि करंट शाहीन बागमध्ये लागेल. तीच री पकडून आपच्या कार्यकर्त्यांनी अमित शाहांना करंट लागला का?, असं विचारत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Web Title: AAP party workers poster of Amit Shah after Delhi Assembly Election 2020 Result.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x