2 May 2024 9:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

मुख्यमंत्री देवीसाठी वेळ देऊ शकत नाहीत तर लोकांना काय देणार: नारायण राणे

Anganewadi Bharadi Devi Yatra, MP Narayan Rane, CM Uddhav Thackeray

रत्नागिरी : कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहिरात ‘सामना’ या शिवसेनेच्या मुख्यपत्रात प्रकाशित झाल्याने शिवसेनेवर चौफेर टीका होत आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची भर पडली आहे. खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

मुख्यमंत्री कोकणात कोणत्या कामासाठी आले होते ते माहित नाही पण एखाद्या ठिकाणी गेल्यावर मुख्यमंत्री तिथे काही ना काही देऊन जातात, ही खरंतर महाराष्ट्राची परंपरा बनली आहे. या मुख्यमंत्र्यांनी मात्र तसे काहीच केले नाही. मुख्यमंत्री येथे आले आणि येथून न बोलताच जाणे त्यांनी पसंत केले, असे सांगत राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा मुख्यालयात फक्त दोन मंत्र्यांची मिनी कॅबिनेट घेतली. अशा कॅबिनेटमधून हे मुख्यमंत्री जिल्ह्याचा काय विकास करणार आणि जिल्ह्याला किती निधी देणार?, अशा प्रश्नांची सरबत्तीही राणे यांनी केली.

दोनच दिवसांपूर्वी (१४ फेब्रुवारी) शिवसेनेच्या सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर या जाहिरातीत होता. ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच’, असा उल्लेख जाहिरातीमध्ये होता.

 

Web Title: Story Anganewadi Bharadi Devi Yatra MP Narayan Rane slams CM Uddhav Thackeray over Sindhudurg Development issues.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x