2 May 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

बेस्ट ऑफ लक: आजपासून बारावीची परीक्षा

Maharashtra HSC Examination, Maharashtra State Education Board

मुंबई : राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (१८ फेब्रुवारी) सुरु होत आहे. राज्यातील एकूण ३०३६ परीक्षा केंद्रांवर १८ फेब्रुवारी ते १८ मार्च असा एक महिना बारावीची परीक्षा होणार आहे. राज्यभरातून १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे ५ लाख ८५ हजार ७३६ विद्यार्थी, कला शाखेचे ४ लाख ७५ हजार ७८४ विद्यार्थी तर व्यावसायिक अभ्यासक्रमचे ५७ हजार ३७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण १५,०५,०२७ विद्यार्थ्यांपैकी ८,४३,५५२ विद्यार्थी तर ६,६१,३२५ विद्यार्थिनी आहेत. राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रे आहेत.

परीक्षेला बसलेले शाखानिहाय विद्यार्थी –

विज्ञान – ५,८५,७३६
कला – ४,७५,१३४
वाणिज्य – ३,८६, ७८४
व्होकेशनल – ५७,३७३
एकूण – १५,०५, ०२७

वेळ- परीक्षेत सर्वात महत्त्वाची असते ती वेळ. बऱ्याचदा परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्यानं पेपर राहिला किंवा पेपरला बसू दिलं नाही अशा तक्रारी समोर येतात. यासाठी पूर्व नियोजन करून वेळेआधी १५ ते २० मिनिटं लवकर परीक्षा केंद्रावर पोहोचावं. जर आपला पेपर १० वाजता असेल तर आपण ९.४० पर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे.

या गोष्टी परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई- खाण्याचा वस्तू, कॉपी, मोबाईल, मेटलचं सामान, रायटिंग पॅड, चेन इत्यादी गोष्टी परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे. या वस्तू आढळल्यास जप्त केल्या जाणार असल्याची पूर्वसूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

 

Web Title: Story Education Maharashtra HSC Board Exam 2020 todays first paper English 14 Lakhs Students gives examination.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x