3 May 2024 8:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

५ लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित IT रिटर्न आणि GST रिटर्न त्वरीत जारी केले जाणार

Corona Crisis, Covid19, IT return

नवी दिल्ली, १२ एप्रिल: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना व्हायरसच्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला होता. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली होती. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली होती.

कोरोना विषाणूचे संकट पाहता केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेबरोबर सामान्य लोकांच्या मदतीसाठीही पाऊल उचललेले आहे. मागील महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी १.७० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सरकारने आतापर्यंत समाजातील विविध वर्गांसाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याचबरोबर नोकरदार आणि करदात्यांसाठीही सरकारने अनेक निर्णयांची घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यावसायिक आणि वैयक्तिक करदात्यांना १८ हजार कोटी रुपयांचा कर परतावा त्वरीत जारी करण्याची घोषणा केली. कर विभागाने एका टि्वटमध्ये म्हटले की, भारत सरकारने निर्णय घेतला आहे की, ५ लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित कर परतावा आणि जीएसटी/कस्टम परतावा त्वरीत जारी केले जातील.

सरकारने कोरोना विषाणूच्या संकटामुळे नोकरदारांसमोर आलेल्या अडचणी पाहता एक विशेष तरतूद केली आहे. त्या अंतर्गत सरकारने कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) खात्यातून तीन महिन्यांइतके वेतन काढण्याची सूट दिली आहे. या रकमेवर सेवा शूल्काचीही सूट दिली आहे. तसेच आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी प्राप्तीकर भरण्याची अखेरची तारीख वाढवून ३० जून २०२० केली आहे. उशिराने प्राप्तीकर भरल्यास द्यावे लागणारे व्याज १२ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आले आहे.

मार्च, एप्रिल आणि मेसाठी जीएसटी विवरणपत्र भरण्याची कालमर्यादा ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्याची कालमर्यादाही ३१ मार्चवरुन ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

News English Summary:  In view of the Corona virus crisis, the central government has taken steps to help the economy as well as the common people. Last month, Finance Minister Nirmala Sitharaman announced a package of Rs 1.70 lakh crore. The government has so far provided around Rs 30,000 crore for various sections of the society. At the same time, the government has announced several decisions for employees and taxpayers.

News English Title: Story Modi government announcement for salaried class and taxpayers in Corona virus crisis Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x