29 April 2024 9:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

कोरोना आपत्ती: पुणे आणि मुंबईत केंद्राची पथकं पाहणी करणार

Covid 19, Corona Crisis

नवी दिल्ली, २० एप्रिल : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असणारं लॉकडाऊन पाहता आता या परिस्थितीतून साऱ्या देशाला बऱ्याच आशा आहेत. अशी माहिती सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यामध्ये नमूद करण्यात आल्यानुसार जवळपास १८ राज्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं दुपटीने वाढणारं प्रमाण घटलं आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या नियमांचे काही राज्यांमध्ये उल्लंघन होत असून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. तसंच काही राज्यांमध्ये करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये रुग्ण वाढत असल्याने त्या राज्यांच्या सहकार्यासाठी केंद्राने पथकं पाठवली आहेत. ही पथकं राज्यांना उपयायोजना आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात मार्गदर्शन करतील, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं. यानुसार महाराष्ट्रातही केंद्राचं पथक दाखल झालं आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढते आहे. तसेच मुंबईतही महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत. या सगळ्या समस्येवर उपाय योजण्याचे काम सुरु आहे. मात्र रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे आता चार राज्यांमध्ये केंद्राचे पथक येऊन पाहणी करणार आहे. देशातील लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही याचीही पाहणी करण्यात येणार आहे.

 

News English Summary: Given the lockdown that has been rampant across the country in the wake of the Corona virus, the country now has high hopes for the situation. This was stated in a press conference held by the Ministry of Health on Monday. As mentioned in this, the rate of coronary infection has doubled in almost 18 states.

News English Title: Story 4 corona hotspots states in India center send 6 team for help says Union home ministry Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x