26 April 2024 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

इराणच्या गणबोटने त्रास दिल्यास सरळ उडवून टाका; ट्रम्प यांचे US नौदलाला आदेश

US Navy, US President Donald Trump, Irani Navy Gunboats

वॉशिंग्टन, २२ एप्रिल: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान पसरलं आहे. कोरोनामुळे जगभरात जवळपास 1 लाख 70 हजारांहून अनेक मृत्यू झाले आहेत. जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या २४ लाख ८३ हजार ८६ इतकी झाली आहे. तर अमेरिकेत ४२ हजार ३६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या देशातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. त्यानंतर इटलीमध्ये २४ हजार ११४ जणांचा बळी गेला आहे. तर त्यानंतर स्पेनमध्ये २१,२८२ लोक दगावले आहेत. ब्रिटनमध्ये १६,५०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

अमेरिकासारखा बलाढ्य देशही कोरोनासमोर हतबल झाला आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत २७०० लोकांची मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत ४१ लाखांहून अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत न्यूयॉर्कमध्ये १५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात इराणच्या नौदलांकडून अमेरिकेची जहाज लक्ष केली जातं असल्याने डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलाला इराणची बोट पाहिल्यास ती उडवून देण्यास सांगितले आहे. ट्विट करत त्यांनी या आदेशाची माहिती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, इराणची नौदलानं समुद्रात आपल्या जहाजांना त्रास दिल्यास सर्व इराणी गनबोटांना उडवून द्या, अशी सूचना ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नौदलाला केली आहे.

विशेष म्हणजे ३ जानेवारी २०२० रोजी अमेरिकेने हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केले होते. त्यानंतर इराण आणि अमेरिकेत तणाव वाढला आहे. दोन्ही देश एकमेकांचे शत्रू बनले आहेत. अमेरिकेच्या या पावलानंतर इराणनेही अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता आणि त्यात ८० लोक ठार झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर अमेरिकेने सांगितले की, सर्व काही सुरक्षित आहे आणि कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.

 

News English Summary: Donald Trump has asked the US Navy to blow up Iran’s boat if it sees it. Tweeting they have informed the order. Trump has suggested to the US Navy that if Iran’s navy disturb its ships in the sea, let all Iranian gunboats fly.

News English Title: Story US President Donald Trump instructed US Navy shoot down all Iran gunboats if they harass our ships Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x