4 May 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढवून भाजपा स्वतःची सुटकेस भरतेय

Priyanka gandhi, Petrol Price Hike

नवी दिल्ली, ६ मे: मंगळवारी रात्रीपासून पेट्रोलवर १० रूपये तर डिझेलवर १३ रुपयाचे उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सतत उत्पादन शुल्क वाढवून संपूर्ण फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरून घेत आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर ६ मेपासून लागू झाले असून, तेल कंपन्यां(ओएमसी)कडून हे शुल्क आकारलं जाणार आहे. पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही. पेट्रोल आणि डिझेलची एमआरपी जशीच्या तशीच राहील. कोरोनाच्या महारोगराईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीकडील काळात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत तेल कंपन्यांनी किमतीत सातत्यानं घसरण सुरूच ठेवली होती. ही वाढ पूर्णपणे अतिरिक्त अबकारी शुल्काच्या स्वरुपात असल्याने त्याचा महसूल केंद्र सरकारला प्राप्त होईल, असे तेल कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या निर्णयावरुन काँग्रेसने भाजपाला लक्ष केलं आहे.

दुसरीकडे, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेतली. या बैठकीला त्यांच्याव्यतिरिक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतरही काही नेते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीत ल़ॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर पुढे काय असा थेट प्रश्न उपस्थित केला. १७ मे या दिवशी लॉकडाऊनचा तिसरा टप्पाही पूर्ण होत आहे. त्यानंतर सरकारची काय रणनिती आहे, अशी विचारणा त्यांनी केली.

 

News English Summary: The government has decided to increase excise duty on petrol by Rs 10 and diesel by Rs 13 from Tuesday night. As a result, Congress general secretary Priyanka Gandhi has targeted the BJP. Priyanka Gandhi has alleged that the Modi government is constantly raising excise duty and taking full advantage of it in its suitcase.

News English Title: Story Congress Leader Priyanka Gandhi Criticize Prime Minister Narendra Modi Petrol Diesel Excise Duty Hike News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x