3 May 2024 3:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

वॉशिंग्टन पोस्टनंही म्हटलं की मुंबईत रूग्ण आकडेवारीची लपवाछपवी झाली नाही - मुख्यमंत्री

Dharavi Covid19, Mumbai, CM Uddhav Thackeray, Saamana Newspaper

मुंबई, २५ जुलै : “जनतेवर आणि यंत्रणेवर माझा विश्वास आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनासाठी राबवल्या जाणाऱ्या धारावी पॅटर्नचा उल्लेख केला. ही नक्कीच आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. नुकतच वॉशिंग्टन पोस्टनंही म्हटलं की मुंबई हे असं शहर आहे ज्यानं कोणतीही आकडेवारीची लपवाछपवी केली नाही. त्यांनी आपल्याबद्दल अशी माहिती देणं ही नक्कीच गौरवाची गोष्ट आहे. म्हणूनची मी आकडेवरी लपवली किंवा अशा काही वक्तव्यांवर लक्ष देत नाही,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली, याच मुलाखतीत हे वक्तव्य त्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, जे रुग्ण कोरोनातून बरे झालेत यात त्यांचा आकडा धरता कामा नये, महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि देशाला पंतप्रधान किती असे विचारता का? मग नेहरुंपासून पंतप्रधान धरणार का? राज्यात यशवंतरावांपासून मुख्यमंत्री धरणार का? असे सगळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान एकत्रित धरत नाहीत. पण आता किती मुख्यमंत्री…एक, यात एकच नाव यायला हवं. कोरोना रुग्णांचा आकडाही कमीच आहे, अगदीच कमी झालाय असेही नाही. कारण काही ठिकाणी संसर्ग वाढतोय, आकडा वाढतोय, पण लवकरात लवकर तो रुग्ण ओळखून त्याला बरं करणे हे महत्त्वाचे आहे असं ते म्हणाले.

 

News English Summary: Recently, the Washington Post also said that Mumbai is a city that has not withheld any statistics. It is a matter of pride for them to give us such information. That is why I did not hide the statistics or pay attention to some such statements, ”said Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: CM Uddhav Thackeray Dharavi Pattern Coronavirus Who Washington Post Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x