27 April 2024 2:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

वीज बिल झटका | सामान्य ग्राहक, नेते मंडळी ते सेलिब्रेटी अशी सर्वांचीच लूट

BJP leader Eknath Khadse, Electricity bill, MahaVitaran

जळगाव, ०७ ऑगस्ट : महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. आता याचा फटका भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही बसला आहे. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी आता राज्य सरकारकडे केली आहे.

कनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील घराचे वीजबिल भरमसाठ आले आहे. लॉकडाऊन काळात एकनाथ खडसे यांना 1 लाख चार हजाराचे बिल आल्याने, त्यांनी रोष व्यक्त केला आहे. लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वाढीव बिलं येत आहेत. सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे बिल अवास्तव आहे, ते न भरण्यासारखे आहे, असं खडसे म्हणाले. नागरिकांना येत असलेल्या अवास्तव बिलामध्ये सवलती, सूट द्या, अवास्तव बिलाच्या तपासण्या करा, अशी मागणी त्यांनी केली. बिलामध्ये काहीतरी सवलती द्या. नागरिकांना वेठीस धरु नका, असं त्यांनी राज्य सरकारला सुनावलं आहे.

 

News English Summary: MSEDCL’s increased electricity bill has hit the common man as well as the veterans. Now senior BJP leader and former minister Eknath Khadse has also been hit. He has expressed his anger over the fact that the bill for his residence in Muktainagar was more than Rs one lakh.

News English Title: BJP leader Eknath Khadse receives one lakh electricity bill three month News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x